महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला 'वर्षा' वर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (7 जुलै) पोहचले आहेत. त्यांच्यासोबत  मनसेचे काही नेते देखील होते. मागील काही दिवसांत राज्याच्या राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडत आहेत. अशामध्ये राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशी चर्चा रंगत असताना आज मनसे अध्यक्ष थेट 'वर्षा' वर पोहचल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. अद्याप या भेटीमागील कारण  समोर येऊ शकलेले नाही. काल अभिजित पानसे आणि संजय राऊत यांची भेट झाली होती त्यानंतर राज ठाकरेंनीही त्यांचा चिपळून दौरा रद्द करत मुंबई गाठली आहे. नक्की वाचा: MNS proposal to Uddhav Thackeray Faction: ठाकरे बंधुंची एकी? मनसे प्रस्ताव घेऊन संजय राऊत यांच्या भेटीला- सूत्र .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)