CM Devendra Fadnavis Moves Into 'Varsha Bungalow': अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस अधिकृत मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा' मध्ये स्थलांतरित झाले, पहा व्हिडीओ (Watch)

देवेंद्र फडणवीस बुधवारी दक्षिण मुंबईतील त्यांचे अधिकृत निवासस्थान 'वर्षा' मध्ये स्थलांतरित झाले. सुमारे साडेपाच वर्षांच्या अंतरानंतर फडणवीस पुन्हा त्याच ठिकाणी राहणार आहेत, जे 2014 ते 2019 या काळात त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. म

CM Devendra Fadnavis Moves Into 'Varsha Bungalow': अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस अधिकृत मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा' मध्ये स्थलांतरित झाले, पहा व्हिडीओ (Watch)
CM Devendra Fadnavis Moves Into 'Varsha Bungalow'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर जवळपास पाच महिन्यांनी, देवेंद्र फडणवीस बुधवारी दक्षिण मुंबईतील त्यांचे अधिकृत निवासस्थान 'वर्षा' मध्ये स्थलांतरित झाले. सुमारे साडेपाच वर्षांच्या अंतरानंतर फडणवीस पुन्हा त्याच ठिकाणी राहणार आहेत, जे 2014 ते 2019 या काळात त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा दुसरा कार्यकाळ फक्त 80 तास चालल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये वर्षा बंगला रिकामा केला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये विरोधी पक्षनेते झाल्यानंतर, फडणवीस 'सागर' येथे गेले आणि तेथे ते उपमुख्यमंत्रीही म्हणून राहिले. पुढे 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही ते आतापर्यंत 'सागर' येथेच राहत होते. फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बुधवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर एक छोटी पूजा करण्यात आली. पूजेनंतर वर्षा येथे ‘गृहप्रवेश’ करण्यात आला. (हेही वाचा: Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 मृतांना राज्य सरकार कडून मदतीचा हात; 50 लाखांची मदत,शिक्षण आणि नोकरी देखील देणार)

CM Devendra Fadnavis Moves Into 'Varsha Bungalow'-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2025 06:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).