बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सध्या वातावरण तापलं असताना महाराष्ट्र सरकार कडून SIT ची स्थापना करण्यात आली आहे. सरपंच देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आल्यानंतर गावकर्‍यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. सध्या या सहा आरोपींपैकी पोलिसांनी प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक केली आहे, तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तीन जण फरार आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व आयपीएस बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे यांच्याकडे असणार आहे. Beed Sarpanch Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाण्यात उभं राहून केले आंदोलन .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)