MLA Nomination List: शिंदे फडणवीस सरकारला महाविकास आघाडी सरकारची विधान परिषदेवरील 12 आमदारांची सुची मागे घेण्यास परवानगी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे फडणवीस सरकारला ठाकरे सरकारकडून सादर केलेली 12 आमदारांची यादी मागे घेण्याची परवानगी दिली आहे.

MLA Nomination List: शिंदे फडणवीस सरकारला महाविकास आघाडी सरकारची विधान परिषदेवरील 12 आमदारांची सुची मागे घेण्यास परवानगी
Eknath Shinde, Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

12 आमदारांच्या (MLA) विधान परिषदेवरील नियुक्तीच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अनेकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचं दार ठोठावल मात्र महाविकास आघाडीच्या सरकारच्या अडीच वर्षाच्या कालखंडात या 12 आमदारांच्या नियुक्तीवर राज्यापालांनी हिरवा कंदिल दाखवला नाही. तर शिंदे सरकारकडून दोन दिवसांपूर्वीच विधान परिषदेवरील या 12 आमदारांची यादी मागे घेण्याबाबत मागणी केली होती. तरी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे फडणवीस सरकारला ठाकरे सरकारकडून सादर केलेली ही यादी मागे घेण्याची परवानगी दिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2022 10:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).