देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेत, एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी त्यांनी आपण मंत्रिमंडळामध्ये सामील होणार नसल्याचेही सांगितले. आता देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. याबाबत फडणवीस यांना विनंतीही करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे केंद्रीय नेतृत्वाने म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी याबाबत माहिती दिली होती. आता माहिती समोर येत आहे की, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या विनंतीवरून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)