Maharashtra Election Exit Poll 2024 Results: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान आज संध्याकाळी 6 वाजता संपले. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या. ज्याचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. आता महाराष्ट्र निवडणुकांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती युतीचे पुनरागमन होण्याचा अंदाज जनमत चाचण्यांनी वर्तवला आहे. चार एक्झिट पोलने महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला स्पष्ट विजयाचा अंदाज वर्तवला आहे. पोल डायरीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला स्पष्ट विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यांच्यामते महायुती - 122-186, महाविकास आघाडी - 69-121 आणि इतर 12-29 अशा जागा मिळण्याची शक्यता आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज आहे. सत्ताधारी महायुतीचा विचार केला तर चाणक्य स्ट्रॅटेजीजने त्यांच्यासाठी 150 ते 162 जागांचा अंदाज वर्तवला आहे. पी मार्कच्या सर्वेक्षणातही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. 41 टक्के मतांसह, महाविकास आघाडी 126 ते 146 जागा मिळवू शकते. एनडीएला 137 ते 157 जागा मिळू शकतात. इतरांना 2-8 जागा मिळू शकतात. (हेही वाचा: Maharashtra Vidhansabha Elections 2024 News18 Lokmat Exit Poll Results Live Streaming: महाराष्ट्रात कोणाचे सरकार स्थापन होणार? जाणून घ्या न्यूज18 लोकमतवर एक्झिट पोल निकाल)
जाणून घ्या काय म्हणतात एक्झिट पोल्स-
#ElectionsWithMC | P-Marq Exit Poll predicts comeback for Mahayuti alliance🚨
🔴Live updates here👇https://t.co/uiCQg8M8an#Mahayuti #MVA #MaharashtraElections2024 pic.twitter.com/LCMIP1NVNj
— Moneycontrol (@moneycontrolcom) November 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)