ऐतिहासिक वास्तू, स्थळे यांबाबत कोणतीही कृती करताना नागरिकांना आता अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. त्यातही या वास्तूंना हानी पोहोचविण्याचा तुमचा विचार असेल तर एकदा नव्हे तर हजार वेळा विचार करा. कारण, महाराष्ट्रातील जुन्या आणि वारसा वास्तूंच्या नुकसानीबाबत कायदा करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. नवीन प्रस्तावित कायद्यानुसार, जुन्या आणि वारसा वास्तूंचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीला 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड आकारला जाणार आहे, अशी तरतूद कायद्यात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)