Maharashtra Assembly Election Results 2024 Zee 24 Taas Live Streaming: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, 2019 च्या 61.1% वरुन, यंदा अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. आता आज सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे निकालाची. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. बऱ्याच एक्झिट पोलमध्ये, महाराष्ट्रात महायुती (शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार) सरकार स्थापन होईल असे दिसते. मात्र आज दुपारपर्यंत, यावेळी जनतेचा निर्णय कोणाच्या बाजूने जाणार, निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारणार, याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात निकराची लढत होणार असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. अशात मराठी वाहिनी झी24 तासवर तुम्ही निकालाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. (हेही वाचा: President's Rule in Maharashtra: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का? निवडणूक निकालानंतर 72 तासांत सत्ता स्थापन न झाल्यास काय होणार? वाचा सविस्तर)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)