Karad (South) Election Results 2024: महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या एकतर्फी विजयाच्या झंझावातामध्ये काँग्रेससह आघाडीतील अनेक बड्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघातून 39,355 मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात चव्हाण यांना 1,00,150 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना 1,39,505 मते मिळाली. चव्हाण यांचा पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण ते 2024 पासून कराड (दक्षिण) मतदारसंघाचे आमदार होते. 78 वर्षीय चव्हाण 2010 ते 2014 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. (हेही वाचा: Mahim Vidhan Sabha Result 2024: 'जनतेचा कौल मला मान्य'; माहीम विधानसभेतील पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया)
पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव -
Former chief minister and senior Congress leader Prithviraj Chavan loses Karad (South) assembly seat by 39,355 votes.
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)