Maharashtra Assembly Election 2024: येत्या 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महाराष्ट्र आणि राजकारणात रस असलेल्या प्रत्येक व्यक्तीला याबाबत उत्सुकता आहे. सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघांसाठी 7,994 हजार उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असून, एकूण 7,073 मेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आता विधानसभा निवडणूक 2024 साठीच्या पक्षनिहाय उमेदवारांची संख्या समोर आली असून, यामध्ये एकूण 159 पक्षांतर्गत 4136 उमेदवार रिंगणात आहेत. (हेही वाचा: Maharashtra Bag-Check Row: निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये; EC अधिकाऱ्यांकडून नाना पटोले यांचे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी)
विधानसभा निवडणूक २०२४ साठीच्या पक्षनिहाय उमेदवारांची संख्या#विधानसभानिवडणूक२०२४#MaharahstraElection2024 pic.twitter.com/i53LvQyBXA
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)