Nana Patole Bag Check by EC (फोटो सौजन्य - ANI)

Maharashtra Bag-Check Row: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या (EC) अधिकाऱ्यांनी गुरुवारी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी केली. नाना पटोले हे गोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी-एससीपीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जात असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या अनेक राजकीय नेत्यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात येत आहे.

गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची बॅग तपासली. निवडणुकीच्या प्रचारासाठी खर्गे नाशिकला गेले होते. तथापी, कराड विमानतळावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही अशाचं पद्धतीने तपासणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरमध्ये प्रचारासाठी आले होते. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची आणि हेलिकॉप्टरची तपासणी केली. (हेही वाचा -EC Officials Check Eknath Shinde's Bag: उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता निवडणूक आयोगाने तपासली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅग (Video))

नाना पटोले यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगची तपासणी, पहा व्हिडिओ - 

यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांना म्हणाले की, 'यात कपडे आहेत. यूरीन पॉट पण चेक करा.' शिंदे यांची ही टिप्पणी म्हणजे उद्धव ठाकरे यांना लगावलेला टोला आहे. कारण, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांवर चांगलेचं संतापले होते. (हेही वाचा - Ajit Pawar's Bag Checked: अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या; निवडणूक अधिकाऱ्यांना काय सापडले? सर्वत्र मिष्कील चर्चा)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी अॅक्शन मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक अधिका-यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची अशाच प्रकारे तपासणी करण्यात येत असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.