महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सोमवारी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर स्नान केले. यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे या महाकार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन ज्या 'पद्धतशीर पद्धतीने' केले आहे त्याचे मुंडे यांनी कौतुक केले. 2027 मध्ये होणाऱ्या त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीसाठी या अनुभवांचा वापर करता यावा म्हणून आपण येथे अभ्यास करण्यासाठी आले असल्याचे त्या म्हणाल्या.

याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, 'हिंदू धर्माचे प्रतीक असलेला महाकुंभपर्वाचा योग हा 144 वर्षांनी जुळून आला असून यानिमित्ताने हिंदू चेतनेचा हा विशाल जनसागर प्रत्यक्ष पाहण्याची संधी मला मिळाली. या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी आतापर्यंत 60 कोटी नागरिक येऊन गेले असून हा एक विक्रम आहे. या कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाले त्या ते देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री.योगी आदित्यनाथ यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा महाकुंभमेळा यशस्वी करण्यासाठी जे नियोजन केले आहे त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.' (हेही वाचा: Mahakumbh 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संतांसह केले त्रिवेणी संगमात पवित्र स्नान)

Maha Kumbh 2025:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)