मुंबईतील मशिदीमधील लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले आहे. मशिदींमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात तक्रारी आल्यानंतरही कारवाई न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘मशिदींमधून होणार्या ध्वनिप्रदूषणावर कारवाई न करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे.’ न्यायालयाने मुंबई पोलिसांना याबाबत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. एका स्थानिक रहिवाशाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. पुढील सुनावणी 29 मे रोजी होणार आहे.
मुंबईच्या कांदिवली परिसरातील लक्ष्मी नगर गौसिया मशिदीच्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. दरम्यान, 2005 साली सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या उपकरणांवर बंदी घातली होती. या आदेशानुसार लाऊडस्पीकरवरून मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, फटाके फोडणे आणि हॉर्न वाजवणे यावर बंदी घालण्यात आली आहे. (हेही वाचा: Mumbai Shocker: जमावाने चोर समजून केलेल्या बेदम मारहाणीत सामान्य नागरिकाचा मृत्यू, बोरिवली येथील घटना)
Bombay High Court reprimands Mumbai Police for not taking action against noise pollution caused by loudspeakers installed in Mosques, even after receiving complaints. “Failure to act on noise pollution from mosques amounts to contempt of court”, says the Bombay High Court
Court…
— ANI (@ANI) May 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)