लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोणावळ्यात भूशी डॅम बॅक वॉटर परिसरात रविवारी घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर आज पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेबद्दल खेद व्यक्त करत जिल्हाधिकारी यांनी यापुढे लोणावळा येथे पर्यटकांना सायंकाळी सहानंतर महत्वाच्या पर्यटनस्थऴावर बंदी घातली आहे. लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली ही जाहीर केली आहे. (हेही वाचा - Children Swept Into Bhushi Dam Update: भुशी धरणामागील धबधब्यात वाहुन गेलेल्या 5 जणांचा व्हिडिओ व्हायरल; पहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण)
आता या परिसरात संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आले आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही कारवाईचा बडगा उगारला जाईल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी दिला.
लोणावळ्यात हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही. त्यांच्यावर कारवााई निश्चित होणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण- तरूण येतात. रात्री गोंधळ घालणे, हुल्लडबाजी करणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. लोणावळा, खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्य हे पावसळ्यात पर्यटकांना भुरळ पडत आहे. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)