Govardhan Village Declare to Boycott Voting: भारतात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात नाशिकसह महाराष्ट्रातील 13 जागांसाठी निवडणूक होणार आहे. आता नाशिकच्या गोवर्धन गावातील मतदारांनी 20 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. गावातील एका ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्यामुळे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.

याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, 'मतदानावर बहिष्काराची घोषणा ऐकल्यानंतर गावातील लोकांशी बोलणे सुरू आहे. त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु तक्रारीनंतर कारवाई करण्याचे काही नियम आणि प्रक्रिया आहेत. त्याअंतर्गत काम केले जाते. भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कारवाई केली जाईल. गावचे प्रतिनिधी येऊन भेटले व आम्ही बोलून हा प्रश्न सोडवू.' (हेही वाचा: Savaniee Ravindrra: मतदान न करताच परतावे लागले, प्रसिद्ध मराठी गायिका सावनी रवींद्रने व्यक्त केला संताप)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)