पुणे महानगरपालिकेने (PMC) आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी शहरातील 15 प्रभागांमध्ये, नागरिकांसाठी ‘तुमचे मतदान केंद्र जाणून घ्या’ ही हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. पुण्यात 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्यांचे मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे यासाठी पुणे शहरात क्षेत्रिय कार्यालयनिहाय हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. यासह नागरिकांना या सेवेचा वापर करून निवडणुकीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी संपर्क साधण्यास प्रोत्साहित केले जात आहेत. पीएमसीने सर्व पुणेकरांना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यंदा पुण्यातून 35 आणि शिरूरमधून 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. तिथे पोटनिवडणूक झाली नाही. भाजपने या ठिकाणी आता मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर उभे आहेत.

(हेही वाचा: Vijay Wadettiwar: 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य; विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)