Vijay Wadettiwar | (Photo Credit: twitter)

Vijay Vadettiwar: 26/11 हल्ल्यात शहीद झालेले माजी एटीस प्रमुख हेमंत करकरे (Former ATS Chief Hemant Karkare) यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करणे विजय वडेट्टीवार(Vijay Vadettiwar) यांना चांगलच अडचणीत आणू शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण भाजप(BJP)ने त्यांच्या या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोग(Election Commission)कडे तक्रार दाखल केली आहे. ‘हेमंत करकरेंना लागलेली ती गोळी ही आरएसएस समर्पित एका पोलीस अधिकाऱ्याची होती.' असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले होते. 'ते पुरावे लपवणारा देशद्रोही कुणी असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला जर भाजप तिकीट देत असेल तर हा देशद्रोह्याला पाठीशी घालणारा पक्ष आहे का? हा प्रश्न आहे’, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं. त्यामुळे आता निवडणूक आयोग याची गंभीर दखल घेते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हेमंत करकरेंना लागलेली ती गोळी ही कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्याची नव्हती. तर ती गोळी आरएसएस समर्पित एका पोलीस अधिकाऱ्याची होती. त्यावेळी ते पुरावे लपवणारा देशद्रोही कुणी असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला जर तिकीट भाजप देत असेल तर हा देशद्रोह्याला पाठीशी घालणारा पक्ष आहे का? हा प्रश्न आहे’, असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलं. या वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर वडेट्टीवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘एस एम मुश्रीफ यांनी जे पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलं आहे,’ असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ‘विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे स्टार प्रचारक आहेत. तसच त्या केसमध्ये उज्ज्वल निकम यांना सरकारने नियुक्त केले होते, आम्हाला राजकारण करायचं नव्हतं’, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.