Lok Sabha Election 2024 Results: महाराष्ट्राचा शेवटचा निकाल अत्यंत धक्कादायक असा लागला आहे. बीड लोकसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. अवघा महाराष्ट्र बीड लोकसभा मतदारसंघातील निकालाची प्रतीक्षा करत होता. या ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्यामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. काही फेऱ्यांमध्ये मुंडे आघाडीवर होत्या, तर काही वेळा सोनवणे आघाडीवर दिसले. त्यानंतर संध्याकाळी उशिरा पंकजा मुंडे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. त्यामुळे बीड लोकसभेचा निकाल राखून ठेवण्यात आला व फेर मतमोजणी सुरु झाली. मात्र अखेर बजरंग मनोहर सोनवणे यांनाच बीडच्या जनतेने नवे खासदार म्हणून निवडून दिले. अशाप्रकारे चुरशीच्या लढतीत पंकजा मुडें मोठा धक्का बसला आहे. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024 Results: 'त्यांनी आमचे सरकार पाडले, आमचा पक्ष फोडला...'; निवडणूक निकालानंतर Aaditya Thackeray यांनी व्यक्त केल्या भावना)
पहा पोस्ट-
शेवटी बजरंग बाप्पा यांनी बाजी मारलीच.
बजरंग बाप्पा सोनावणे - 6,81,569 मते.
पंकजा पालवे मुंडे - 6,74,984 मते.
बजरंग बाप्पा - 6,585 मतांनी विजयी..!
बजरंग बाप्पा सोनावणे आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन..! #बीड_लोकसभा pic.twitter.com/SbN4qSr8KV
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)