Ladki Bahin Kutumb Bhet Abhiyaan: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी आजपासून, म्हणजेच 10 सप्टेंबरपासून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ कुटुंब भेट अभियानाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी प्रत्येक घरी जाऊन बहिणींची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चा लाभ त्यांना मिळाला अथवा नाही ते त्यांच्याकडून जाणून घेतले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा महायुती सरकारच्या टॉप १० योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे, योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणे, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे, शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

ठाण्यातून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियाना'चा शुभारंभ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)