कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण मध्ये आज मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यापैकी अजून एक मोठा दावा म्हणजे ड्रग्स प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांना काही मंत्र्यांच्या मुलांना देखील गोवण्याची कारस्थानं झाली आहे. मलिकांच्या दाव्यानुसार मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील या पार्टी  सहभागी होण्यासाठी आग्रह करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 'उडता पंजाब' प्रमाणे 'उडता महाराष्ट्र' करण्याचा हा डाव होता,' असे ते म्हणाले आहेत. कॉर्डेलिया क्रूझवर पार्टीचं आयोजन करणारा ड्रग्ज पेडलर काशिफ खान यानं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील पार्टीचं आमंत्रण दिलं होतं. असे ते म्हणाले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)