आदित्य ठाकरे यांनी कर्नाटकातील विजयावर कॉंग्रेसचं अभिनंदन केले आहे. कर्नाटकातील जनतेने दाखवून दिले आहे की ते शांतता, प्रेम आणि भ्रष्ट शासनाच्या विरोधात मतदान करतील. पण यावेळी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील 'गद्दारां'ना देखील सुनावले आहे. कर्नाटकाप्रमाणे जेव्हा महाराष्ट्रालाही मतदानाची पहिली संधी मिळेल तेव्हा 'गद्दारांना' जनता त्यांची जागा दाखवून देईल. असंवैधानिक, अनैतिक आणि भ्रष्ट असलेल्या  बिल्डर-कंत्राटदार राजवटीत महाराष्ट्राला जबरदस्तीने ढकललं असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. Rahul Gandhi on Karnataka Election Results 2023: 'शक्ती' ला 'ताकदी' ने हरवलं... कर्नाटक मधील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयावर राहुल गांधींची प्रतिक्रिया .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)