महाराष्ट्रात मराठा आंदोलनासह आता पाण्याबाबत वातावरण तापण्याची शक्यता आहे. नुकतेच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट करत, मराठवाड्यामध्ये सुरु असलेल्या मराठा आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी एका पत्राचा फोटो शेअर केला आहे. अशोक चव्हाण यांच्या या पोस्टने राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने जायकवाडी धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पोस्ट केलेल्या पत्रात कोणतेही तथ्य नाही, असेही सांगण्यात आले आहे. अनेक माध्यमांनी याबाबत अहवाल दिले आहेत. मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यास कोणताही विरोध नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन होणार असल्याचीही माहिती सरकारने दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (हेही वाचा: MHADA Lottery: खुशखबर, म्हाडाच्या 11 हजार घरांच्या किमती होणार कमी; गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंनी केली घोषणा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)