MHADA Lottery: खुशखबर, म्हाडाच्या 11 हजार घरांच्या किमती होणार कमी; गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंनी केली घोषणा
म्हाडाकडून सर्व सामान्यांसाठी खुशखबर देण्यात आली आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
MHADA Lottery: म्हाडाकडून सर्व सामान्यांसाठी खुशखबर देण्यात आली आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना घर घेण्याच्या बाबतीत दिलासा मिळणार आहे. म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. विक्री अभावी पडून असलेल्या घरांच्या किमतींचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री सावे यांनी दिली आहे.
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार असल्याचं घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांचीच किमत कमी होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फायदा होणार आहे. घरांच्या किमती कमी करून पुनविक्रि करणार असल्यांच ही यावेळी मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. म्हाडाच्या सुमारे 11 हजार घरांच्या किंमती कमी होणार आहेत.
संबंधित घरांच वीज बिल, पाणी पट्टी भरावी लागत असल्यानं म्हाडाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आल्याच यावेळी गृहमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट सांगितले. संबंधित घरांचं वीज बिल, पाणी पट्टी यामध्ये म्हाडाचा बराच पैसा खर्च होतो. अशा तब्बल 11 हजार घरांची कमी किमती करुन पुन्हा विक्री करण्यात येणार असून नुकसान टाळत महसुल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Nov 24, 2023 02:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

