जन आशीर्वाद यात्रा रोखण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न अपयशी ठरला असून उद्यापासून यात्रेला पुन्हा सुरुवात होत आहे, अशी घोषणा महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसंच राणेसाहेबांच्या पाठीशी कोकणवासी खंबीरपणे उभे ठाकतील आणि आम्हाला आशीर्वाद देतील, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूडबुद्धीने अटक करून जन आशीर्वाद यात्रा रोखण्याचा प्रयत्न सत्ताधारी मविआने केला. मात्र, जन आशीर्वाद यात्रा उद्यापासून पूर्ववत सुरू होत आहे. राणेसाहेबांच्या पाठीशी कोकणवासी खंबीरपणे उभे ठाकतील आणि आम्हाला आशीर्वाद देतील, अशी खात्री व्यक्त करतो.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)