'जळगावचा मन्या सुर्वे' या नावाने सोशल मीडीयात एक व्हिडिओ वायरल होत आहे. यामध्ये बलोरो गाडीवर दोन व्यक्ती बसून प्रवास करताना दिसत आहेत. अशाप्रकारे गाडी चालवणं हे ट्राफिक नियमांचं उल्लंंघन करणारं आहे तसेच यामुळे दहशत पसरू शकते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या प्रकारावर आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. त्यांचा माफिनामा शेअर करत अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. Jalgaon: वीजेचा आकडा काढायला गेलेल्या महावितरण ग्रामस्थाकडून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, Watch Video .
पहा व्हिडिओ
जळगाव पोलीस यांच्याकडून जनतेस आवाहन...
शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने व्हिडिओ बनवून प्रसारित करणाऱ्या इसमावर रामानंदनगर पोलीस स्टेशन यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे...
अशा प्रकारचे कृत्य किंवा व्हिडिओ बनवणाऱ्यांनावर देखील कारवाई करण्यात येईल... pic.twitter.com/XQdcco0xGj
— जळगाव पोलीस Jalgaon Police (@JalgaonPolice) May 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)