कोर्टात हजर राहताना साधे कपडे परिधान करणाऱ्या पोलिसांवर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तसेच सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या गणवेशात कोर्टात हजर राहावे, असेही सांगितले. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएस गडकरी आणि न्यायमूर्ती पीडी नाईक यांच्या खंडपीठाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान ही टिप्पणी केली. एका सुनावणीदरम्यान, वकील सुभाष झा यांनी न्यायमूर्ती एएस गडकरी आणि न्यायमूर्ती पीडी नाईक यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करताना सांगितले की, न्यायालयात येणारे पोलीस अधिकारी न्यायालयाच्या शिष्टाचाराचे पालन करत नाहीत आणि साध्या पद्धतीचे कपडे घालून हजर राहतात. यावर न्यायमूर्ती गडकरी यांनी सांगितले की, कोर्टात हजर राहताना सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी गणवेश परिधान करणे अपेक्षित आहे. न्यायमूर्तींनी नमूद केले की, यापूर्वी त्यांनी असे न केल्याबद्दल एका अधिकाऱ्याला दंड ठोठावला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)