गुवाहाटीतील (Guwahati) 40 आमदार जिवंत प्रेत आहेत. त्यांचे आत्मा मेले आहेत. ते परत आल्यावर त्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी थेट विधानसभेत पाठवले जातील. इथं पेटलेल्या आगीत काय होऊ शकतं हे त्यांना माहीत आहे, अशी जहरी टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले 'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.... तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू...'

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)