Nashik Accident : नाशिकच्या दिंडोरी म्हसरुळ रोडवर दुपारी 2 वाजेच्या दरम्यान बोलेरो जीप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जाणांचा मृत्यू (die) झाल्याची माहिती मिळत आहे. बोलेरो जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून एक टायरही फुटल्याचे समजते आहे. जखमी (injured) ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. (हेही वाचा :First Accident In Mumbai Coastal Road Tunnel: मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यामध्ये पहिला अपघात; काही दिवसांपूर्वी झाले होते उद्घाटन, व्हिडिओ व्हायरल )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)