Historical Films in Tents: राज्यातील टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत. विविध शासकीय योजनांची माहिती तळागळातील जनतेपर्यंत पाहचविण्यासाठी या चित्रपट खेळांच्या दरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातींचीही प्रसिद्धी करावी. याबाबत विभागाने तातडीने योग्य पावले उचलावीत, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. टुरिंग टॉकीज, तंबूतील सिनेमांचे जतन व पुनर्वसन यासंदर्भात वनमंत्री मुनगंटीवार यांनी मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठक घेतली.
सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखविल्यास थोर महापुरुषांचे विचार व कार्य घराघरात पोहोचेल. या चित्रपट खेळादरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातीही दाखविल्यास शासकीय योजना ही तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. जाहिरात प्रसारणामुळे टुरिंग टॉकीज व तंबू मालकांना आर्थिक बळकटीही मिळेल. टुरिंग टॉकीज व तंबू मालकांना देण्यात येणारे भांडवली अनुदान एक रक्कमी देण्याबाबत मुनगंटीवार यांनी सूचना केल्या. (हेही वाचा: गँग्स ऑफ वासेपूर, RHTDM, तुंबाड आज पुन्हा सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला; लोकांचाही चांगला प्रतिसाद)
टुरिंग टॉकीज व तंबूमधून दाखवले जाणार ऐतिहासिक चित्रपट-
राज्यात टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत. या चित्रपट खेळादरम्यान विविध शासकीय योजनांची माहिती तळागळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय योजनांच्या जाहिरातींचीही प्रसिद्धी करावी,अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री @SMungantiwar यांनी यासंदर्भातील बैठकीत दिल्या pic.twitter.com/iGJHAnJjAk
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)