Mumbai Rainfall Update: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये शुक्रवारीही मुसळधार पाऊसाने हजरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी ठाणे, रायगड, पुणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. याशिवाय मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. आयएमडीने जारी केलेल्या रेड अलर्टमुळे प्राधिकरणाने पालघर आणि ठाण्यात शुक्रवार आणि शनिवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज मुंबईतील अनेक उपनगरांमध्ये धुवाधार पावसाने हजेरी लागली. त्यामुळे उपनगरातील विविध भागांमध्ये पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. (हेही वाचा - Nanded Rains: नांदेड मध्ये पावसाची मुसळधार; 12 गावात पुरसदृश्य स्थिती, 1000 जणांना हलवले सुरक्षित ठिकाणी)
पहा व्हिडिओ -
#WATCH | Maharashtra: Waterlogging in various parts of Mumbai due to rainfall.
(Visuals from King's Circle area) pic.twitter.com/fMkz0VSfKP
— ANI (@ANI) July 21, 2023
Andheri subway shut due to water logging and heavy rains
— ANDHERI LOKHANDWALA OSHIWARA CITIZEN'S ASSOCIATION (@AndheriLOCA) July 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)