महाराष्ट्रात पुन्हा बर्डफ्लू चा धोका वाढला असल्याचं वृत्त मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी चर्चेत होतं. यामुळे लोकांमध्ये खळबळही पसरली होती परंतू अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करत अशा प्रकारे सद्यस्थितीत राज्यात कुठेही या विषाणूचा प्रादुर्भाव नाही असं म्हटलं आहे. H5N1 हा विषाणू माणसांनाही संक्रमित करु शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
#बर्डफ्लू (#H5N1) या नवीन रोग प्रादुर्भावाचा धोका वाढला असल्याच्या आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र, सद्यस्थितीत राज्यात कुठेही या विषाणूचा प्रादुर्भाव नाही, असे अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. pic.twitter.com/rUPWMvHdlr
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)