Vietnam Student Dies From Bird Flu : बर्ड फ्लू माणसात पसरतोय?, व्हिएतनाममध्ये विद्यार्थ्याचा H5N1 इन्फ्लूएंझा व्हायरस संसर्गाने मृत्यू

व्हिएतनामच्या आरोग्य मंत्रालयाकडून एक खळबळजनक बाब समोर आली आहे. H5N1 या संसर्गामुळे मानवाचा मृत्यू होऊ शकतो असे एका घटनेतून समोर आले आहे. न्हा ट्रांग विद्यापीठातील 21 वर्षीय विद्यार्थ्याचा एच 5 इन्फ्लूएंझा विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

Vietnam Student Dies From Bird Flu : बर्ड फ्लू माणसात पसरतोय?, व्हिएतनाममध्ये विद्यार्थ्याचा H5N1 इन्फ्लूएंझा व्हायरस संसर्गाने मृत्यू
Photo Credit - Twitter

Vietnam Student Dies From Bird Flu : व्हिएतनाममध्ये एका २१ वर्षीय विद्यार्थ्याचा H5N1 या बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे मृत्यू (Student Die)झाला आहे. मंगळवारी २६ मार्च रोजी व्हिएतनामच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबतची पुष्टी केली. न्हा ट्रांग विद्यापीठातील हा विद्यार्थी होता. विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे बर्ड फ्लूच्या (Bird Flu)संसर्गामुळे मानवाचा मृत्यू होऊ शकतो असे समोर आले आहे. आतापर्यंत व्हिएतनाममधील सहा प्रांत आणि शहरांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.(हेही वाचा :First Avian Bird Flu Case in Antarctica: अंटार्क्टिकामध्ये एव्हियन बर्ड फ्लूच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी; शास्त्रज्ञांनी व्यक्त केली 'पर्यावरणीय आपत्ती'ची भीती )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2024 01:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).