निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सुचनेप्रमाणे पूर्वी राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका 13 ऑक्टोबर (October) रोजी होणार असुन मतमोजणी 14 ऑक्टोबरला पार पडणार होती पण आता निवडणूक आयोगाकडून आता या तारखांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे, संबंधित माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. तसेच आता या ग्रामपंचायत निवडणुका 13 ऑक्टोबर ऐवजी 16 ऑक्टोबरला होणार आहे तर मतमोजणी 17 ऑक्टोबरला होईल असं निवडणूक आयोगाकडून सुचित करण्यात आलं आहे.
राज्यातील विविध १८ जिल्ह्यांच्या ८२ तालुक्यांमधील ११६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान होईल; तर मतमोजणी १४ ऑक्टोबर ऐवजी आता १७ ऑक्टोबरला होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. pic.twitter.com/rA3zMxyGMg
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)