बदलापूर येथील आदर्श विद्यालयमध्ये अल्पवयीन दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको केला. दुसऱ्या बाजूला शाळेतही तोडफोड केली. दरम्यान, गुन्हेगारास कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन देत नागरिकांची समजूत काडू पाहणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांना नागरिकांच्या रोशास सामोरे जावे लागले. 'आरोपीला आमच्या ताब्यात द्या' अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली. तसेच, उपस्थित जमावातून 'फाशी.. फाशी.. फाशी' असाही आवाज उमटला.
दरम्यान, घडलेली घटना वाईट आहे. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. सरकारनेही या घटनेची दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. नागरिकांची भावना समजू शकतो. मात्र, पाठिमागील पाच ते सहा तासापासून नागरिक रुळावर बसले आहेत. त्यामुळे लोकल ट्रेनवर परिणाम झाला आहे. परंतु रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे हजारो लोक याचा वापर करतात. मुख्यमंत्री आणि डीसीएम म्हणाले की, एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, चौकशी केली जाईल आणि त्यावर जलदगतीने कारवाई केली जाईल... दोषीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे... ज्यांनी निष्काळजीपणा दाखवला, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे गिरीश महाजन म्हणाले. (हेही वाचा- Badlapur Minor Sexual Assault Case: बदलापूर येथे संतप्त पालकांकडून शाळेची तोडफोड; शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण)
गिरीश महाजन काय म्हणाले?
#WATCH | Alleged sexual assault with a girl child at a school in Badlapur | At Badlapur Station, Maharashtra Minister Girish Mahajan says, "A protest has been ongoing here for the past 5-6 hours, people are sitting on the railway track. It is natural, because this is such an… pic.twitter.com/Mi8ceRq1kK
— ANI (@ANI) August 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)