G-20 परिषदेला पुण्यामध्ये कालपासून सुरूवात झाली आहे. या बैठकीमध्ये सहभागी प्रतिनिधी पुण्यात स्थानिक कलाकारांसोबत लेझीम च्या तालावर थिरकताना दिसले आहेत. G-20 हा जगातील 20 प्रमुख देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. जगातील 19 देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे G-20 मध्ये प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी मुंबई मध्येही अशाच प्रकारे प्रतिनिधी स्थानिक लोककलाकारांसोबत थिरकताना दिसले होते.
#WATCH | Maharashtra: G-20 delegates joined local artists performing Maharashtrian lezim dance at a cultural program in Pune yesterday pic.twitter.com/aZ7jW0e8ha
— ANI (@ANI) January 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)