Beed Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातचं आता बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात एक महिला शिक्षिका आणि भात शिजवणाऱ्या महिलेमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायल मिळत आहे. पालकांनी मध्यान्न आहाराबद्दल तक्रारी केल्यानंतर शिक्षिकेने भात शिजवणाऱ्या महिलेकडे यासंदर्भात जाब मागितला. त्यानंतर संतापलेल्या महिलेने शिक्षिकेला मारहाण केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, नंतर दोघींनीही एकमेकींचे केस ओढले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)