एकनाथ शिंदे यांच्यासह बंड केलेल्या आमदारांना आता भाजपची साथ मिळाली आहे. काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर, आज एकनाथ शिंदेआणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर संध्याकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा हा निर्णय असून, साहजिकच यामुळे शिंदे गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे. गोव्यात असलेल्या आमदारांनी नृत्य करत ही आनंदाची बातमी साजरी केली. सध्या या आमदारांच्या नृत्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH | Eknath Shinde-faction MLAs, staying at a hotel in Goa, celebrate following his name being announced as the Chief Minister of Maharashtra. pic.twitter.com/uJVNa4N74g
— ANI (@ANI) June 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)