Eknath Khadse : पूर्वाश्रमीचे भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा स्वगृही परतणार असल्याचं बोललं जात आहे. येत्या काही दिवसात त्यांचा भापजमध्ये प्रवेश होईल. असं प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक होते. परंतू पक्षाने त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे नाराज झालेले खडसे नेहमी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. जमीन घोटाळ्याचे आरोप, पक्षांतर्गत हेटाळणीमुळे पुढे खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खडसेंना फारकाही मिळालं नाही. पक्षात कायम मागे राहिलेल्या खडसेंच्या हाती काहीच लागलं नव्हतं. त्यातच आता ते पुन्हा स्वगृही परतणार असल्याचं बोललं जातंय. शनिवारी रात्रीच त्यांचा प्रवेश होईल, असं वृत्त 'एबीपी माझा'ने दिलं आहे. मात्र, त्यासाठी केंद्राकडून त्यांना एक अट घालण्यात आली आहे. खडसे यांना त्यांच्या विधानपरिषदेतील आमदारकीचा राजीनामा द्यावा लागले. (हेही वाचा :Eknath Khadse Joins BJP: एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार, भाजप प्रवेश झाला निश्चित )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)