पुणे येथील पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने जामीन मिळताच रॅप सॉन्ग तयार केल्याचा दावा केला जात आहे. या कथीत रॅप सॉन्गमध्ये वापरलेली भाषा अत्यत गलिच्छ आणि अपमानास्पद असून या सॉन्गचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. "एक दिन में मुझे मिल गई.. फिर से दिखाऊंगा सड़क पे खेल," अशा ओळीही या गाण्यात उल्लेखल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या व्हिडिओची पुष्टी केली नाही. तसेच, पोलिसांनी या व्हिडीओला दुजोरा दिला नसला तरी अनेकांनी हा डीपफेक असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. LatestLY या व्हिडिओची पुष्टी करत नाही. या प्रकरणातील आरोपीची आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. (हेही वाचा, Pune Porsche Car Accident: 1 तास TV, 2 तास खेळण्याची वेळ; 'असा' असणार पुण्यातील कार अपघातातील अल्पवयीन मुलांचा बालगृहातील दिनक्रम)
व्हिडिओ
जामीन मिळाल्यानंतर आरोपीनं गायलं "रॅप सॉंग".
रॅप सॉंग मधून आरोपीची लोकांना गलिच्छ शिवीगाळ.
कारट्याला अल्पवयीन म्हणावं का?#Pune_Accident pic.twitter.com/bVt32pNL7k
— Swapnil Taware (@SwapnilSpeaks93) May 23, 2024
व्हिडिओ
एक दिन मे मुझे मिल गयी बेल... फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, पुण्यातील बिल्डरपुत्राचा माज, अपघातानंतर चीड आणणारं कृत्य, बेल मिळाल्यानंतर शिवीगाळ करणारं रॅप साँग
(एबीपी माझा या व्हिडीओची पुष्ठी करत नाही, हा व्हिडीओ डीप फेक आहे का याचा तपास पोलिस करत आहेत)https://t.co/pmxLUjxlXv…
— ABP माझा (@abpmajhatv) May 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)