खासदार संजय राऊत यांना लॉरेंस बिष्णोई गॅंग कडून धमकीचा मेसेज आल्याने खळबळ माजली असताना आता या प्रकरणी एक जण पुण्यातून ताब्यात घेण्यात आला आहे. त्याच्या माहितीनुसार, दारुच्या नशेत संजय राऊतांना धमकी देण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे असे  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पण या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल असेही फडणवीसांकडून  सांगण्यात आले आहे. आरोपी 23 वर्षीय राहुल तळेकर आहे. त्याचा लॉरेंस बिष्णोई गॅंग शी काहीही संबंध नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)