गेले अनेक महिने महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात असलेले साई रिसॉर्ट प्रकरण चर्चेत आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचा आरोप आहे. यात सदानंद कदम आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब हे भागीदार असल्याची माहिती आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या घोटाळ्याचा आरोप केला आहे. आता न्यायालयाने साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर येत आहे. किरीट सोमय्या यांनी सोशल मिडियावर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. साई रिसॉर्ट विध्वंस प्रकरणात जिल्हा न्यायालय खेड/रत्नागिरी यांनी महाराष्ट्र शासन/जिल्हाधिकारी अपील मंजूर केले, असून हे रिसॉर्ट पडण्याचे आदेश देण्यात आल्याचे सोमय्या यांनी सांगितले. या सोबत त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची प्रतही जोडली आहे.

याआधी मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. हे रिसॉर्ट पाडण्याची जाहीरात वृत्तपत्रातही देण्यात आली होती. (हेही वाचा: Onion Price: कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी केंद्र सरकारवर संतापले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)