Onion Price: कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकरी केंद्र सरकारवर संतापले.
Onion Market (Pic Credit - All India Radio News Twitter)

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ होत असल्यामुळे शेतकरी सुखावला होता.

देशाच्या काही भागात कांद्याचे दर 80 ते 90 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. मात्र केंद्राने 5 राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या राज्यांमध्ये 25 रुपये प्रति किलो दराने बफर स्टॉकमधील कांद्याची विक्री सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात जवळपास 1 हजार रुपयांपर्यंत घसरण झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आणले आहे. 5 राज्याच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर सरकारने हा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे. (हेही वाचा - Breathless Mumbai: मुंबई शहरातील 78% परिवारांपैकी एक सदस्य प्रदुषणाने त्रस्त)

अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारात कांद्याचे भाव वधारल्याने थोड फार नुकसान भरून निघेल, असं शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र केंद्राने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले आहे.  आपल्याला झालेल्या नुकसान भरून काढण्याची वेळ जेव्हा आली होती त्यावेळी असा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या 5 राज्यांमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तेथील मतदारांना खुश करण्यासाठी तिथं 25 रुपये प्रतिकिलो दराने आपल्या बफर स्टॉकमधील कांदा विक्री सुरू केली आहे.