मध्य रेल्वे कडून ठाणे स्थानकात 63 तासांचा आणि सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा विशेष ब्लॉक आज दुपारी 3.30 च्या सुमारास संपणार होता पण वेळे आधीच काम पूर्ण झाल्याने आणि दोन्ही स्थानकात ट्रेनची ट्रायल यशस्वी पार पडल्याने मध्य रेल्वेकडून हा ब्लॉक वेळे आधीच संपल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाणे प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्तार करण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. दरम्यान या विशेष ब्लॉक मुळे मागील 2 दिवसांपासून प्रवाशांचे हाल झाले होते.

मध्य रेल्वेचा ब्लॉक संपला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)