परदेशात कोरोनाच्या नवीन प्रकारांचा उद्रेक होत असून, जूनमध्ये चौथी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बीएमसीने नुकतेच 11 वे  जीनोम सिक्वेन्सिंग केले. या अंतर्गत 300 हून अधिक कोविड रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या नमुन्यांचे निकाल समोर आले असून, त्यामध्ये 228 किंवा 99.13% (230 नमुने) ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. यासह कोविड 19 च्या ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट एक्सई (XE Variant) चे देशातील पहिले प्रकरण मुंबईमध्ये आढळले आहे. सोबतच एका रुग्णामध्ये कापा (Kapa) हा व्हेरिएंट आढळला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)