रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे ; नागरिकांनीही खबरदारी बाळगावी असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी त्यांनी केलेल्या सूचना: pic.twitter.com/xe01ESCdce
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 22, 2021
नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.
सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे.
कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)