महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील बल्हारशाह रेल्वे जंक्शनवर फूट ओव्हर ब्रिजचा स्लॅब कोसळल्याची घटना आज घडली. फूट ओव्हर ब्रिजच्या प्री-कास्ट स्लॅबचा काही भाग आज सायंकाळी 5.10 च्या सुमारास खाली पडला. या घटनेत 4 जण जखमी झाले असून सर्वांना प्राथमिक उपचारानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मध्य रेल्वेचे शिवाजी सुतार, सीपीआरओ यांनी ही माहिती दिली. रेल्वेने गंभीर जखमींना 1 लाख रुपये आणि साध्या जखमींना 50,000 रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. जखमी व्यक्तींना लवकर बरे होण्यासाठी इतर रुग्णालयात हलवून त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)