मुंबईतील जोगेश्वरी परसिरात असलेल्या एका इमारतीमध्ये ऑटोमॅटिक कार पार्किंगची लिफ्ट कोसळली आहे. ही घटना बुधवारी (8 मार्च) रात्री घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, इमारतींमधील लिफ्ट देखभालीचा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने अधोरेखीत झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील युनिवर्सल क्यूबिकल कॉम्पलेक्स (Universal Cubical complex) इमारतीमध्ये ही लिफ्ट कोसळली. ज्या ठिकाणी वाहने पार्क करण्यात आली होती. त्याच ठिकाणी ही लिफ्ट कोसळली. धक्कादायक म्हणजे लिफ्टमध्ये एक सीएनजी सिलेंडरही होता. दरम्यान, इमारतीतील सुरक्षा यंत्रणांनी वेळीच आवश्यक खबरदारी घेतली. ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. घटना घडल्यानंतर इमारत आणि परिसरात बराच काळ भीतीचे वातावरण होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)