पाकिस्तानच्या कराचीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पूरग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली असून, बसमधील 17 प्रवाशांचा जिवंत मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बस कराचीहून खैरपूर नाथन शाह परिसरात जात होती. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Pakistan Bus Fire Video) झाला आहे.
ट्विट
Fire erupted in a bus enroute from Karachi to Larkana.
Several Injured.#JamshoroIncident #FirePrevention #Jamshoro pic.twitter.com/zFO1GtvAeW
— Syed Sibte Hassan Rizvi (@SibteHR) October 12, 2022
दरम्यान, सुपर हायवेवर नूरियााबादजवळ एका बसला भीषण आग लागली. यानंतर बसमध्ये आरडाओरडा झाला. स्थानिक नागरिकांनी मदत आणि बचाव कार्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, अपघातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)