शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला वर्षपूर्वी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे. राजभवनावर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy CM Of Maharashtra) शपथ घेतली आहे. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांसोबत एनसीपीच्या 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते आनंद दुबे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "जे नेते कालपर्यंत विरोधी पक्षात होते आणि सरकारवर टीका करायचे, तेच नेते आज त्याच सरकारमध्ये सामील झाले आहेत. आज भाजपला अजित पवार हवे होते, म्हणून त्यांनी त्यांना घेतले, पण आपण विसरता कामा नये. पाठीत वार करण्याचा भाजपचा इतिहास आहे.
#MaharashtraPolitics | Uddhav Thackeray faction leader and spokesperson Anand Dubey, says "The leaders who were in the opposition and used to criticise the government until yesterday, have joined the same government today. Today BJP wanted Ajit Pawar, so they took him, but we… pic.twitter.com/TWecjMHnuD
— ANI (@ANI) July 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)