केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष बाण हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील हक्काबाबत सुनावणी झाली होती. त्त्यानंतर आता याबाबत निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला.

या निर्णयानंतर उद्धव ठाकरे सतत भाजपवर हल्ले करत आहेत. आजही उत्तर भारतीय जनतेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘आम्ही आधीही हिंदुत्त्ववादी होतो. आजही मी म्हणतो की मी हिंदू आहे. मी हिंदुत्व काहीही सोडणार नाही. मी फक्त भाजपला सोडले आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही आणि त्यांचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. आमच्या वडिलांच्या भाषेत सांगायचे तर राष्ट्रीयत्व हेच खरे हिंदुत्व. आमचे हिंदुत्व देशाशी जोडले गेले आहे.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)